रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (14:17 IST)

शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अॅप तयार करूया: अक्षय कुमार

देशासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या, लढणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक अॅप तयार करूया असे आवाहन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केले आहे. अक्षयने मंगळवारी जम्मू येथे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 
 
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले. त्या शहिदांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला. यावेळी त्याने जवानांशी संवाद साधला.