सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (10:19 IST)

आलिया भट्टचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची हृदयशस्त्रक्रिया

aliya
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. नुकतीच महेश भट्ट यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या महिन्यात ते त्यांच्या तपासणीसाठी गेले होते, तिथे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजले. अशा परिस्थितीत त्यांची आता अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या ते घरीच बरे होत आहेत.
 
गेल्या महिन्यात आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी त्याला लवकरच शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट याने याला दुजोरा दिला आहे. राहुलने सांगितले की, त्याच्या वडिलांना या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदय शस्त्रक्रियेनंतर ते आता पूर्णपणे बरे झाले  असून ते घरी परतले आहे. 
 
महेश भट्ट यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी 'मंजिलें और भी हैं' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. यानंतर त्यांनी 'सारांश', 'आशिकी', 'जेहर', 'जिस्म' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांनी 'राज', 'दुष्मन' आणि 'फूटपाथ' या चित्रपटांचे लेखनही केले आहे.
 
 
Edited By - Priya Dixit