गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 13 एप्रिल 2020 (10:04 IST)

रामायणाच्या संपूर्ण टीमचा 33 वर्षांपूर्वीचा फोटो तुफान व्हायरल, अरुण गोविल यांनी केला शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. या मालिकेला अनपेक्षित प्रतिसाद देखील मिळत आहे. प्रेक्षक पुन्हा रामायणबद्दल उत्सुक असल्याने रामायणाच्या संपूर्ण टीमचा 33 वर्षांपूर्वीचा एक जुना फोटो तुफान व्हायरल होत आहे. रामायणात श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी हा फोटो शेअर केला आहे.
 
या फोटोमध्ये रामानंद सागर यांच्यासोबत रामायणातील सर्व पात्र दिसत आहेत. ‘ही आहे टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली कीर्तिमान स्थापित करणारी टीम. रामानंद सागर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे चित्रपटसृष्टीमधील सर्वात प्रतिभावान आणि भाग्यवान कलाकार’ असे या फोटोला कॅप्शन आहे.