शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:49 IST)

रामायणातील गूढ कथा... रावण जवळ येताच सीता गवत हातात का घेते?

रावण सीतेचे हरण करून लंका घेऊन गेल्यावर सीता अशोक वाटिकेत बसून चिंतन करतं होती. रावण सीतेला वारंवार धमक्या देत होता. त्याने रामाचे वेष करून सीतेला गोंधळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळाले नाही. त्याला त्यांचा पत्नीने समजविले की आपण सीतेसमोर रामाच्या रूपाने गेल्यावर पण सीतेने आपल्याकडे वर मान करून बघितले सुद्धा नाही. रावणाने उत्तर दिले की मी रामाचे वेष करून तिथे गेलो होतो पण मला तिथे सीता दिसलीच नाही. त्यानंतर रावणाने पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि तो सीतेजवळ गेला. सीतेने त्वरित तिथे पडलेली गवताची पेंढी हातात घेतली आणि त्याकडे बघू लागली तिने रावणाकडे वर नजर करून बघितले सुद्धा नाही. त्यावर लंकापती म्हणाला की तुला गवत प्रिय का बरं? माझ्याकडे बघ तर. त्यावर सीतेच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. आता आपण देखील यामागील गोष्ट जाणून घ्या- 
 
या मागील कारण असे की जेव्हा राम आणि सीतेचे लग्न झाले होते. प्रथेनुसार नव्या नवरीला काही तरी घरात गोडधोड करावयाचे असते. जेणे करून घरात गोडवा कायमचा राहतो. म्हणून सीतेने घरात खीर बनवली होती. सर्व कुटुंब राजा दशरथ, तिन्ही राण्या, चारही भाऊ, संत महात्मा जेवायला बसले होते. देवी सीता स्वतःचा हाताने सर्वांना वाढत होती. तेवढ्यात जोराचं वारं सुटलं आणि सगळ्यांनी आपापल्या पत्रावळीला सांभाळले. तेवढ्यात तिने बघितले की गवत वाऱ्याने उडत-उडत राजा दशरथाच्या खिरीच्या वाटीत पडला. आता त्या वाटीत हात घालून काढावयाचे कसे म्हणून तिने त्या लहानग्या गवताकडे रागाने बघितले. ते जळून खाक झाले. तिला वाटले की कोणीही तिला असे करताना बघितले नाही. पण असे करताना राजा दशरथांनी बघितले होते. ते त्यावेळी सीतेला काही बोलले नाही पण नंतर त्यांनी सीतेला बोलवून म्हटले की देवी आज मी आपल्या या चमत्काराला बघितले आहे आपण साक्षात जगत जननी आदिशक्ती स्वरूप आहात. 
 
आपण लक्षात असू द्या की ज्या प्रकारे आपण आज त्या गवताकडे बघून त्याला भस्म केले तसं काहीही घडले तरी आपण आपल्या शत्रूला बघावयाचे नाही. त्यामुळे देवी सीताच्या सामोरी ज्या-ज्या क्षणी रावण यायचा सीता गवत धरून दशरथांच्या म्हणण्याचा मान राखायची. सीतेत एवढी शक्ती होती की तिच्या मनात असते तर ती त्याच क्षणी रावणाला भस्मसात करू शकली असती पण त्यांनी राजा दशरथास असे न करण्याचे वचन दिले होते. 
अशी महान होती सीता माई ........