गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :नवी दिल्ली / जिनिव्हा , गुरूवार, 16 जुलै 2020 (19:31 IST)

बच्चन म्हणतात, 'ही' लोक आहेत दु:खी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना प्रकृती विषयी अपडेट देत असतात. तसेच ते आपल्या चाहत्यांसोबत विचार देखील शेअर करत असतात. नुकतच त्यांनी आपल्या पोस्टमधून जीवनाचा सार सांगितला आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘सभी से ईर्ष्या, घृणा करने वाले, असंतोषी, क्रोधी, सदा संदेह करने वाले और पराये आसरे जीने वाले ये छः प्रकार के मनुष्य हमेशा दुखी रहते हैं. अतः यथा संभव इन प्रवृत्तियों से बचना चाहिए.’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये सहा प्रकारच्या दुःखी व्यक्तीबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांनी नकारात्मक प्रवृत्तींपासून बचाव करण्याचा सल्ला देखील दिला आहे.