गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत

ट्विटरवर २०१७ मध्ये बाहुबली २ हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही  चर्चा रंगल्या. वर्षभरात भारतीयांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा रंगली याबाबत ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या अहवालात मनोरंजन विभागात बाहुबली २ सर्वाधिक चर्चा झालेला विषय असल्याचे समोर आले आहे. तर वृत्त आणि राजकारण या विभागात जीएसटी आणि मन की बात हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंग होते. मनोरंजन क्षेत्रात या वर्षी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे २०१७ मध्ये हे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले.

क्रीडा विभागात भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक दहा लाख ८० हजार ट्वीट झाले. तर सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे.