शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (23:07 IST)

बिग बॉस फेम अभिजित बिचकुलेचा अपघात

Abhijit Bichukale
बिग बॉस फेम अभिजित बिचकुलेचा पुण्यात अपघात झाला असून त्याचा डोक्याला दुखापत झाली आहे. अभिजित बिचकुले यांच्या कारचा अपघात झाला असून त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या चारही मित्रांना या अपघातात दुखापत झाली आहे.अभिजित हे कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यांना अपघातानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेले नंतर त्यांना सोडून विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.अपघाताचे कारण समजू शकले नाही. अभिजीतच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधून त्यांनी  कोरकोळ मार लागला असून माझी प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं.  
 
Edited By- Priya Dixit