रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (14:34 IST)

Happy Birthday Vicky Kaushal: अभिनयासाठी विकी कौशलने सोडली इंजिनियरिंग, चॉलमध्ये गेले बालपण

विकी कौशलने त्याच्या अभिनयामुळे, प्रत्येकास वेडं केलं आहे. आज त्याने आपल्या कठोर परिश्रमाच्या बळावर बॉलीवूडमध्ये एक खास जागा मिळवली आहे. आज विकी कौशल त्याचा 31वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणून, या विशेष प्रसंगी, विकीशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ.    
 
विकीचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबई येथे झाला. त्याने 2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनियराच्या रूपात ग्रॅज्युएशनची पदवी प्राप्त केली. आज ख्यातिप्राप्त विकीने काही काळ मुंबईच्या चॉलमध्ये घालवला आहे.   
2010 मध्ये विकीने अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात सहाय्यक म्हणून काम केले होते. नीरज घयावन चित्रपटाचे असिस्टंट डायरेक्टर होते. जेव्हा नीरजने आपले चित्रपट 'मसान' वर काम करण्यास सुरुवात केली तर त्यांनी विकीला देखील ऑडिशनसाठी बोलवलं. तेथून, विकीचे  बॉलीवूड करिअर सुरू झाले. 'मसान' मध्ये विकीचे काम प्रेक्षकांनी खूप पसंत केले. यापूर्वी विकीने एक शॉर्ट फिल्म 'गीक आऊट' आणि 'लव शव ते चिकन खुराना', 'बॉम्बे वेलवेट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.   
मार्च 2016मध्ये विकीचे दुसरे चित्रपट 'जुबान' रिलीज झाले. विकीचे पुढचे चित्रपट अनुराग कश्यपचे सायको थ्रिलर 'रमन राघव 2.0' होते, ज्यात त्याने व्यसनाधीन भूमिका बजावली होती. चित्रपटातील त्याची भूमिका नकारात्मक होती, पण प्रेक्षकांना ती देखील फार आवडली. यानंतर विकीने 'राजी' या चित्रपटात धमाल केले. या चित्रपटातून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर 'संजू', 'मनमर्जियां' आणि 'उरी' मध्ये दमदार अभिनयाचे फार कौतुक झाले. तिन्ही चित्रपटांत त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली आणि आज तो बॉलीवूडच्या टॅलेंटेड ऍक्टर्सपैकी एक मानला जात आहे. विकीचा आगामी चित्रपट 'सरदार उद्दम सिंह' आहे. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे.