1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 28 जानेवारी 2023 (08:55 IST)

सेलिब्रिटी जोडीचे आधी रिलेशन, लग्न आणि आता के एल राहुल आणि आथिया शेट्टीला मिळालेल्या गिफ्ट्सची चर्चा

क्रिकेट आणि सिनेसृष्टी यांच्यातील नातं चांगलच घट्ट होत चालल आहे. या आधी देखील या दोन विश्वांना जोडणाऱ्या कित्येक जोड्या समोर आल्या आहे आणि त्यापैकी एक नाव हे के एल राहुल आणि अभिनेत्री तथा अभिनेते सुनील शेट्टी यांनी कन्या आथिया शेट्टी या जोडप्याचे आहे. या सेलिब्रिटी जोडीच्या रिलेशनशिपची त्यानंतर लग्नाची जितकी चर्चा झाली तीच चर्चा आता त्यांना मिळालेल्या गिफ्ट्सची देखील होत आहे.
 
मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि तब्बल महिनाभरापासून लग्नाची चर्चा असलेल्या भारतीय क्रिकेटर के एल राहुल आणि अभिनेत्री तथा अभिनेते सुनील शेट्टी यांनी कन्या आथिया शेट्टी हे दोघे नुकतेच लग्न बंधनात अडकले. सुनील शेट्टी याच्या खंडाळा इथल्या आलिशान फार्महाऊसमध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विवाहसोहळा अत्यंत खासगी स्वरुपाचा करण्यात आला. विवाह सोहळ्याला दोन्ही बाजूचे जवळचे नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळींना निमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती.
 
आता राहुल आणि आथिया यांच्या लग्नानंतर त्यांना लग्नात मिळालेल्या गिफ्ट्सची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विराट कोहली पासून ते सलमान खान पर्यंत अश्या अनेक दिग्गजांनी या नवविवाहित जोडप्याला लाखो करोडोंची गिफ्ट्स दिली आहेत. या गिफ्ट्सची यादी सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.
 
सोशल मीडियावर वायरल यादी नुसार आथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी या नवविवाहित जोडीला मुंबईत ५०कोटींचा आलिशान फ्लॅट गिफ्ट दिलाय तर, भारतीय टीमचा माजी कर्णधार बॅटिंगचा किंग, अर्थात विराट कोहली याने तब्बल २ कोटी १७ लाखांची बीएमडब्ल्यू कार, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने १ कोटी ६४ लाखांची ऑडी कार, अभिनेता अर्जुन कपूर याने १ कोटी ५० लाखांचे ब्रेसलेट, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याने ८० लाखाची कावासाकी निन्जा ही स्पोर्ट्स बाईक आणि जॅकी श्रॉफ याने ३० लाखांचे महागडे घड्याळ गिफ्ट दिले आहेत. या सेलिब्रिटी जोडीच्या रिलेशनशिपची त्यानंतर लग्नाची जितकी चर्चा झाली तीच चर्चा आता त्यांना मिळालेल्या गिफ्ट्सची देखील होत आहे.
 

Edited By- Ratnadeep Ranshoor