मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 18 जानेवारी 2023 (11:22 IST)

KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी घर सजवले आहे. 
अथिया आणि केएल राहुल 23 जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात लग्न करणार आहेत. 21 जानेवारीपासून हळदी, संगीत आणि मेहंदीचे विधी सुरू होणार आहेत. या लग्नसोहळ्यात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2018 सालापासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही खास प्रसंगी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या एका होत्या.
 
एका जवळच्या कौटुंबिक मित्राने मीडियाला सांगितले की, “अथिया आणि केएल राहुलचे लग्न अगदी साधेपणाने होणार आहे. या जोडप्याच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशिवाय चित्रपटसृष्टीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. खंडाळ्यात त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. हे लग्न सुनील शेट्टीच्या बंगल्यावर होणार आहे, जो सध्या सजवला जात आहे.
Edited By- Priya Dixit