#Metoo प्रभाव: इंडियन आयडलमधून अन्नू मलिकची हकालपट्टी
मुंबई- लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संगीतकार अन्नू मलिक यांना इंडियन आयडल 10 च्या परीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे.
पार्श्वगायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यासह आणखी दोन उभरत्या गायिकांनी अन्नू मलिक यांच्या लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान मलिकने सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी टू मोहिमेचा वापर मोठय़ा व्यक्तीच्या चारित्र्यावर घाला घालण्यासाठी केला जातोय, असे वक्तव्य मलिक यांच्या वकिलाने केले आहे.
सूत्राप्रमाणे सोमवारपासून मलिक कोणत्याही भागाचे शूटिंग करणार नाहीत .सध्या विशाल दादलानी आणि नेहा कक्कर हे रिऑलिटी शोचे परीक्षक आहेत.