शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2017 (15:34 IST)

दंगल’ हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘दंगल’ हा चित्रपट आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या कुस्तीपटू होण्याच्या प्रवासावर बेतलेल्या या चित्रपटाने ३४० कोटींची कमाई करत आता ३५० कोटी रुपयांच्या कमाईची वाट धरली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही त्यांनी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा जाहिर केला आहे. प्रदर्शित झालेल्या दिवसापासूनच आमिरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील एक एक विक्रम मोडित काढायला सुरुवात केली होती. सलमान खानच्या ‘बरजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा विक्रम मोडित काढत आमिरच्या ‘दंगल’ने ‘पीके’ या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.