सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2017 (11:31 IST)

'दंगल' जागतिक पातळीवर ५ व्या क्रमांकावर

अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमा जगभरात इंग्रजी चित्रपटाव्यतीरिक्त जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. चीनमधील चित्रपटगृहांमध्ये ‘दंगल’ सिनेमा 5 मे रोजी रिलीज झाला. त्यानंतर दंगलच्या कमाईचा आकडा तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींवर पोहचला.चित्रपटांच्या जागतिक कमाईचा दंगलने केलेला हा रेकॉर्ड आत्तापर्यंत फक्त पाच चित्रपटांनी केला असून दंगल पाचव्या स्थानावर आहे. हॉलिवूडचे चित्रपट कमाई करण्यात नेहमीच पुढे असतात. पण फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. त्यात दंगलने स्थान मिळवल्यानं दंगलच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे असच म्हणावं लागेल.