Daily Horoscope
✕

दिलीप साहेब यांचा पगार 1250 रुपये तर राज कपूर यांचा 175 रुपये होता ...

Updated: बुधवार, 7 जुलै 2021 (12:13 IST)
 
सर्वांना ठाऊक आहे की दिलीप कुमार यांचे खरे नाव युसुफ खान होते आणि त्यांचा जन्म पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला होता. त्याच्या वडिलांचा फळांचा चांगला व्यवसाय होता. 1947 मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा खान खानदानावर कहर झाला आणि त्याचे वडील त्यांच्याकडे असलेल्या ठेवी घेऊन भारतात आले होते.
 
फाळणीनंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आणि फिल्मी जगात नशीब आजमावण्यासाठी युसूफ मियां मुंबईला गेले. त्यांचे वडील निधन पावले होते आणि त्यांच्यावरही 5 भाऊ आणि 6 बहिणींची जबाबदारी होती.
 
युसूफ साहबचा चित्रपट जगतातला संघर्ष कायम राहिला आणि त्या दरम्यान डॉ. मसानी यांना त्यांच्या प्रतिभेची खात्री पटली आणि त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या मालक देविका राणीकडे नेले. देविका राणी यांनी त्यांच्यातील कलाकारांचे कौतुक केले आणि दरमहा 1250 रुपये मानधन निश्चित केले.
 
त्या काळी 1250 रुपयांची रक्कम खूप मोठी होती. जेव्हा त्यांनी घरी येऊन सांगितले की माझा पगार 1250 रुपये निश्चित झाला आहे, तेव्हा घरातील सदस्यांना त्यांच्या शब्दावर विश्वासच बसला नाही. ते म्हणाले की आपण चुकीचे ऐकले आणि एका वर्षासाठी आपल्याला 1250 रुपये मिळतील कारण राज कपूर यांचा पगारा महिन्याला 175 रुपये असायचा ...
 
दिलीप कुमारांना सुद्धा एक क्षण असे वाटले की त्याच्या कानात काही चुकले नाही? त्यांना हे देखील माहित होते की राज कपूर मासिक पगाराच्या 175 पगारावर काम करतात. ही शंका दूर करण्यासाठी दिलीप साहेबांनी डॉ. मसानी यांना बोलावून त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली. डॉ. मसानी देविका राणीशी बोलले ... देविका राणी म्हणाली, त्यांना सांगा की 1250 रुपये मासिक उपलब्ध असतील ...
 
देविका राणींचा हा संदेश मिळाल्यावर दिलीपकुमार यांचे भाऊ व बहिणींना वाईट दिवस संपत असल्याचा आनंद झाला. संपूर्ण जगाला हेही ठाऊक आहे की दिलीप कुमारने एकामागून एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वेळेसह त्यांना प्रसिद्धी मिळवू लागली आणि त्याच्यावर पैशांचा वर्षाव होऊ लागला. त्याने सर्व 11 भाऊ-बहिणींचे विवाह स्वतःच केले ... त्यांच्या संसार थाटवा यात स्वतःचा संसार विसरले .. किंवा असे म्हणावे की त्यांनी कुटुंबासाठी खूप त्याग केले.
 
जेव्हा दिलीपकुमार शेवटी आपला संसार थाटला तेव्हा ते 44 वर्षांचे होते. खरं तर, साईरा बानो दिलीप साहेबांवर चित्रपट आन पाहिल्यापासूनच फिदा होत्या. तेव्हा त्या लंडनमध्ये शिक्षण घेत होत्या.
 
दिलीप साहेबांना संतान सुख मिळालं नाही परंतु हे जाणून घेणं आवश्यक आहे की 1972 मध्ये, सायरा बानो गर्भवती झाल्या होत्या परंतु उच्च रक्तदाबमुळे आठव्या महिन्यात गर्भपात झाला. या अपघातानंतर त्या कधीच आई होऊ शकल्या नाही.
 
सायरा बानो आई बनल्या नाही परंतु त्यांनी दिलीप साहेबांची संपूर्ण सर्मपण आणि प्रेमाने काळजी घेतली. 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments