गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (10:39 IST)

दिलीप कुमार यांना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बच्चन यांनी दिली श्रद्धांजली

'दिलीप कुमार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला,'असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं. दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलाविश्वाचं मोठे नुकसान झाल्याचंही ते म्हणाले.
 
महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, "भारतीय सिनेमाचा इतिहास दिलीप कुमार यांच्याआधी आणि त्यांच्यानंतर असाच लिहिला जाईल."