सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:25 IST)

'साहो’ ची बक्कळ कमाई

प्रभास व श्रद्धाची मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ने पहिल्या दिवशी तब्बल ६८ कोटी रुपये कमावले आहेत. तर फक्त भारतात हिंदी भाषेतील चित्रपटाने २४.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’ची फक्त भारतातील कमाई पाहिल्यास २०१९ या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ‘भारत’ तर दुसऱ्या क्रमांकावर ‘मिशन मंगल’ आहे. ‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘साहो’ने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ व ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.