मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (10:55 IST)

करीनासोबत सेल्फीसाठी फॅन्स अनकंट्रोल

karina kapoor
बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण कधी-कधी हे चाहते इतके वेडे होतात की ते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी गैरवर्तनही करतात. अलीकडे करीना कपूर तिच्या चाहत्यांमुळे नाराज झाली आहे.
 
खरंतर, करीना कपूर सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसली. करिना विमानतळावर कारमधून बाहेर पडताच सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांच्या गर्दीने तिला घेरले. करिनासोबत सेल्फी काढण्यासाठी लोक धक्काबुक्की करू लागले.
 
 हद्द तेव्हा झाली जेव्हा एका व्यक्तीने अभिनेत्रीच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. हे सर्व पाहून अभिनेत्री खूप अस्वस्थ होते. करिनाच्या चाहत्यांच्या अशा वागण्यामुळे ती नक्कीच घाबरली पण तिला अजिबात राग आला नाही. सर्वांचे आभार मानून करिना संयमाने तिथून निघून गेली.

Edited by : Smita Joshi