शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (13:01 IST)

Neeraj Chopra: गोल्डन बॉयने चाहत्यांसोबत गरबा केला, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये होणाऱ्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पीव्ही सिंधू यांनी उपस्थिती लावली असून बडोदऱ्यात नीरज ने चाहत्यांसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतला. चाहत्यांसोबत गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
वडोदरा येथे आयोजित एका कार्यक्रमात नीरजने जोरदार गरबा केला. यावेळी त्यांच्यासोबत समालोचक चारू शर्माही उपस्थित होत्या. दोघांनी मिळून तिथे उपस्थित लोकांसोबत जबरदस्त डान्स केला. नीरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने गुजरातचा गरबा जगभर प्रसिद्ध आहे. 
 
Edited By - Priya Dixit