बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चा फर्स्ट लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग संग्राम भालेराव ही व्यक्तिरेखा निभावणार आहे. रोहीत शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरुन रणवीरचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. हा सिनेमा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात रणवीर निळ्या रंगाच्या शर्ट-पॅंटमध्ये दिसत आहे. यात  रणवीर तडफदार पोलीसाची भूमिकेत दिसणार की मनमौजी, गंमतीरशीर पोलिस अधिकारी साकारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

 

फोटो शेअर करत रणवीरने लिहिले की, रोहीत शेट्टीचा हिरो... या सिनेमात रणवीर सिंगसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहे. यापूर्वी सारा केदारनाथ हा सिनेमा करत होती. मात्र केदारनाथ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्याच्या अडकल्याने सिम्बा हा तिचा डेब्यू सिनेमा ठरु शकतो.