बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आयफा अवॉर्ड 2017 : शाहिद, आरिलाला सर्वश्रेष्ठ सन्मान

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘आयफा ऍवॉर्ड ‘ सोहळा मेटलाइफ स्टेडियम येथे संपन्न झाला. या सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूरला ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्‍टर म्हणून अवॉर्ड देण्यात आला तर आलिया भट्टने बेस्ट ऍक्‍ट्रेसचा अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
 
या सोहळ्यात सलमान खान, आलिया भट्ट, शाहिद कपूर, नेहा धूपिया आदींसह अनेकांनी या ऍवॉर्ड नाईटमध्ये भाग घेतला होता. सोनम कपूर स्टारर ‘नीरजा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर ‘पिंक’चे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांना बेस्ट डायरेक्‍टर म्हणून गौरविण्यात आले.
 
विजेत्यांची यादी खालील प्रमाणे –
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट – नीरजा
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहिद कपूर (उडता पंजाब)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (डिअर जिंदगी/ उडता पंजाब)
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अनिरुद्ध रॉय चौधरी (पिंक)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार – अनुपम खेर (एमएस धोनी)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार – शबाना आझमी (नीरजा)
 
सर्वोत्कृष्ट खलनायक – जिम सर्भ (नीरजा)
 
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वरुण धवन (ढिशूम)
 
सर्वोत्कृष्ट संगीतकार – प्रीतम (ऐ दिल है मुश्‍किल)
 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अमित मिश्रा (बुलया-ऐ दिल है मुश्‍किल )
 
सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायिका – कनिका कपूर (डा डा डस्से – उडता पंजाब ) आणि तुलसी कुमार (सोच ना सके – एयरलिफ्ट)
 
सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरे या – ऐ दिल है मुश्‍किल )
 
स्टाईल आयकॉन ऑफ द इयर – आलिया भट्ट
 
सर्वोत्कृष्ट कथा – कपूर अँड सन्स
 
वुमन ऑफ द इयर – तापसी पन्नू (पिंक)
 
बेस्ट डेब्यू हिरोईन – दिशा पटानी (एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी)
 
बेस्ट डेब्यू हिरो – दिलजीत दोसांज (उडता पंजाब)