गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (15:25 IST)

कमल हसन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

kamal haasan
लोकप्रिय अभिनेते कमल हसन यांची प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी रात्री त्यांना चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना ताप आला होता, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
 
कमल यांना ताप आणि अस्वस्थता असल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. पुढील काही दिवस त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र अद्याप यावर कमल यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
 
सध्या कमल हासन त्यांच्या आगामी तामिळ चित्रपट मॅग्नम ओपसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय इंडियन 2 बद्दलही ते चर्चेत आहे. त्याच्याशिवाय सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.