Festival Posters
✕

कमल हसन 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार

Updated: सोमवार, 23 मे 2022 (09:16 IST)
 
दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या विक्रम या चित्रपटाची सुरुवातीपासूनच लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. निर्माते संपूर्ण भारत स्तरावर चित्रपट प्रदर्शित करत आहेत. हा चित्रपट 3 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. राज कमल यांच्या 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल' या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.
 
2 मिनिटे 38 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कमल हासन अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तमिळ भाषेत रिलीज करण्यात आला आहे. सध्या कमालचा हा अवतार पाहून चाहते खूपच खूश आहेत. या ट्रेलरला आतापर्यंत 8.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निर्मात्यांना याआधी चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ दुबईत होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रिलीज करायचा होता, पण काही कारणास्तव चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारंभात तो प्रदर्शित करण्यात आला.
 
नुकतेच चित्रपटाचे पहिले गाणे  'पत्थला-पत्थला' रिलीज झाले, जे येताच वादात सापडले. या गाण्यामुळे कमल हसनवर गुन्हाही दाखल झाला आहे. रिपोर्टनुसार, या गाण्यात केंद्र सरकारची खिल्ली उडवण्यात आली असल्याचा दावा एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. अशा परिस्थितीत या गाण्याचे काही बोल काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

पुढील लेख
Show comments