गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

20 अंगरक्षक करणार करिनाची सुरक्षा

तैमूरच्या जन्मानंतर पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करुन करिना कपूर खान आता सज्ज झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती ‍अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर, निर्माती एकता कपूरबरोबर करीत आहे. सोनम कपूर यात प्रमुख भूमिकेत असणारच आहे.

सोनमसोबतच मुख्य भूमिकेत करिना दिसणार असून त्याचबरोबर स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या पण भूमिका असून वीरे ‍दी वेडिंग च्या शूटिंगसाठी सध्या सर्व अभिनेत्री राजधानी दिल्लीत पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच करिना ती करीत असलेल्या जाहिरातीच्या संदर्भात‍ दिल्लीत गेली होती. त्यावेळी तिला बघण्यासाठी नऊ- दहा हजार लोकांची गर्दी झाली होती व त्यांना आवरताना नाकीनऊ आले होते. त्या गर्दीमुळे करिनाची कारदेखील पुढे सरकू शकत नव्हती. शेवटी कसेबसे तिला गर्दीतून बाहेर काढले गेले.
 
वीरे दी वेडिंग रोड-टिप फिल्म असून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात बरेच आउटडोर शूटिंग होणार आहे. त्यामुळे या प्रसंगापासून धडा घेत चित्रपटाच्या टीमने करिना कपूरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.