suvichar
✕

Kiara-Sidharth Wedding: कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख ठिकाण फायनल!

Updated: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (11:31 IST)
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहेत. कडेकोट बंदोबस्तात सिद्धार्थ आणि कियाराचं भव्य लग्न होणार आहे. अलीकडेच दोघेही मनीष मल्होत्राच्या ठिकाणी एकत्र पोज देताना दिसले.
 
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न करणार आहेत. त्यांचे हळदी, मेहंदी, संगीत कार्यक्रम 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी कॅप्टन बत्राच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चा होत होत्या. त्याच वेळी, दोघेही पार्ट्यांपासून सुट्टीपर्यंत एकत्र स्पॉट झाले आहेत. या दोघांनाही चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
 
सिद्धार्थ मल्होत्रा सध्या ​​'मिशन मजनू' या स्पाय थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो 'योद्धा' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 07 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. तर कियारा यावर्षी 'भूल भुलैया' या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. याशिवाय नुकताच त्याचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री पुढे #RC15 या तात्पुरत्या शीर्षकाच्या चित्रपटात रामचरणच्या विरुद्ध दिसणार आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

माधुरी दीक्षित समोर गौतमी पाटीलचं स्पष्ट वक्तव्य; “एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन पाहा, मग टीका करा!”

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कृष्ण दास यांच्या कीर्तनाला उपस्थित, भक्तीमध्ये मग्न असलेले दिसले

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

पुढील लेख
Show comments