लकी अली म्हणतात आय लव्ह उद्धव
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. यासगळ्यात गायक लकी अलीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लकी अली यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं “आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला.” या पोस्टमध्ये फुल स्टॉप असं म्हणतं त्यांनी यावर मला आणखी काही बोलायचं नाही, असं दाखवलं आहे.
याआधी गेल्या वर्षी लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं.