शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (09:04 IST)

आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे : अरविंद सावंत

Arvind Sawant
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत. आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे’, असा इशारा दिला आहे.
 
या बंडखोर आमदारांच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यात बैठक झाली. जवळपास साडे तीन तास ही बैठक झाली. या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
“बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडलेत. बंडखोरांना घातपात झालं की कळेल. 4 दिवसात बंडखोरांवर कारवाई होईल”, असं सावंत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. ते माध्यमांशी बोलत होते. यासह बंडखोर आमदारांना त्यांची बाडू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचंही सावंत यांनी नमूद केलं.