बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (08:54 IST)

आदित्य ठाकरे यांनी साधला महाराष्ट्रातील नगरसेवकांशी संवाद

“मला वाटलं मुंबईचे नगरसेवक असतील, पण नंतर कळलं सगळेच महाराष्ट्रातील नगरसेवक आपले उपस्थित आहेत, जेव्हा फूट पडते तेव्हा उत्साह नसतो, पण परवापासून म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं तेव्हापासून लोक रस्त्यावर उतरून शिवसेनेसाठी लढायचं आणि जिंकायचं असं बोलताना दिसले”, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी महाराष्ट्रातील नगरसेवकांशी संवाद साधताना म्हटले.  महाराष्ट्रातील सर्व नगरवसेकांशी त्यांनी ऑनलाईच्या माध्यमातून संवाद साधला. 
 
“प्रत्येक महिन्याला सर्वांसोबत बसून सामान्यांचे प्रश्न सोडवत आलो, इतर शहरात नगरपालिका, महानगर पालिका कोविड काळात केलेलं काम संपूर्ण देशाने पाहिले. सध्या खासदारांची मुख्यमंत्री मोहोदयांसोबत बैठक सुरू आहे. पन्नास टक्के आमदार गेलेले परत येतील, काहींना जेवायला जायचं सांगून घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लढाईसाठी तयार राहायला सांगितलं. काही दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी ही कुरबुर ऐकली तेव्हाच त्यांना बोलावून तुम्हाला हवं तर मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. होतं. पण काही राक्षसी, महत्वकांक्षा बाळगणाऱ्यांनी हे केलं. त्यांची पुढची वाट म्हणजे त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही, भाजपमध्ये विलीन झाल्या शिवाय पर्याय नाही.”, असं आदित्य ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधताना म्हटले.
 
“शिवसेनेची भूमिका प्राण जाय पण वचन न जाय अशी आहे. पण आपण पुढे जात असतात बंड केलेले तिथून सुटून परत येतील त्यांना घेऊन पुढे जायचं. नितीन देशमुख परत आले, त्यांनी काय झालं ते सांगितलं. काही रुसवे फुगवे असतील, तर सुरत आसाम मध्ये जाऊन बंड केलं नसतं, सेना प्रमुखांशी प्रथा आहे, त्यानुसार पक्ष प्रमुखांकडे बोलायचं होत. पुढे लढत जायचं आहे, जिंकत जायचं आहे. आपण का, कोणासाठी लढतोय ? ते आपल्याला कळलं. मागचे दोन्ही बंड आपण पाहिले तेव्हा आपण जिंकलो आहोत. नंतर झालेले बंड दोन वर्षात त्यांचं काय झालं आणि आता ते कुठे आहेत ते आपल्याला ठाऊक आहे”, असेही ते म्हणाले
 
“आपलं सरकार आता आलं, आपण कामं करतोय. कामं करणं आपलं कर्तव्य बनतं. शिवसेनेची आपण बांधणी करतोय, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी काम करायचं, जे सोबत नाहीत ते आपले विरोधक आहेत. मात्र, नगरसेवकांची ही ताकत आहे, तसेच, रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक आपण पाहिले. अनेक बंड विरोधातून सत्तेत जाण्यासाठी असतात, पण हे पाहिलं बंड सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे. हृदयावर आणि मनावर सत्ता गाजवणारे म्हणजे आपले मुख्यमंत्री आहे, जिथे जिथे गेलो तिथे उद्धव साहेबांचे कौतुक लोक करत होते. राजकीय नाही, तर सर्वसामान्य लोक उद्धव साहेबांचे कौतुक करतात ही मोठी गोष्ट आहे. जेजे सर्व्हे झाले , कुठे अभ्यास झाला , त्यात उद्धव साहेब पहिल्या क्रमांकावर असलेले आपले मुख्यमंत्री आहेत. लोकांची कामं करणारे मुख्यमंत्री आहेत”, असेही ते म्हणाले
 
“मुख्यमंत्र्यांची शास्त्रकारिया झाली आहे अश्यावेळी त्यांनी बंड केला. पण ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. तन मन लावणारे लोक आपल्याला हवेत, प्राईस टॅग लावलेले नको आहेत. ईडी आणि सीबीआय या यंत्रणा लावल्या जातात. पण शिवसैनिक म्हटल्यावर संघर्ष लढा आपल्याला नवीन नाही. आदित्यजी काही करा पण मविआचं सरकार देशासाठी महत्वाचं आहे असं लोक बोलतात. आपण महाराष्ट्र पुढे न्हेत राहिलो. तसेच, सगळे सोबत आहात का ? जर सगळे सोबत असाल तर भगव्या रंगात वातावरणात आपण निवडणूक साजरी करू”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.