शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (11:14 IST)

मुंबईत आल्यावर शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागेल- संजय राऊत

sanjay raut
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडाचा आज चौथा दिवस आहे.
 
गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई, सूरत, गुवाहाटी येथे वेगाने घटना घडत आहेत.
 
शिवसेना आणि काही अपक्ष असे 46 आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, तर दुसरीकडे सरकारने या आमदारांविरोधात काही कारवाई करता येते का, याचा विचार सुरू केला आहे.
 
बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे यांनी आपल्याबाजूने आहे असे म्हटले आहे, यावर तुमचे मत काय आहे असे पत्रकारांनी संजय राऊत यांना आज शुक्रवारी सकाळी विचारले. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ही कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पाहू काय होतं ते. त्यांनी एक निर्णय घेतलाय. बहुमत हा फक्त चर्चेला. ते मुंबईत येतील तेव्हा बाळासाहेबांवरील भक्तीची शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागेल. महाविकास आघाडीच्या बाजूनेच आमदारंचा कौल असेल."
 
आता महाराष्ट्रातील जनतेला मात्र यापुढे नक्की काय होणार, हे सरकार टिकणार की जाणार, गेले तर नवे सरकार कोणाचे असेल असे प्रश्न पडले आहेत.