शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (20:39 IST)

TATA Nexon EV Fire देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार मुंबईच्या रस्त्यावर जळून खाक, वाहतूक ठप्प

Tata Nexon EV catches fire in Mumbai
मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सची प्रसिद्ध आणि सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक SUV (Tata Nexon EV Fire) मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. टाटा मोटर्सने याबाबत एक निवेदन जारी केले असून ते या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करत असल्याचे म्हटले आहे. लवकरच कारणे शोधून काढली जातील.
 
इलेक्ट्रिक कार जळण्याची पहिली घटना
गेल्या काही महिन्यांत देशात अनेक इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, इलेक्ट्रिक कारला लागलेल्या आगीमुळे ईव्हीचे ग्राहक आणखी घाबरले आहेत. या घटनेमुळे चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षाही चव्हाट्यावर आली आहे. वृत्तानुसार ही घटना मुंबईतील पंचवटी हॉटेलजवळ वसई पश्चिमेची आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बुधवारचे आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अनेक संमिश्र प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
 
चौकशी करणार असल्याचे टाटा मोटर्सने सांगितले
टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास करण्यात येत आहे. आम्ही आमच्या संपूर्ण तपासणीनंतर तपशीलवार अहवाल सादर करू. आम्ही आमच्या वाहनांच्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. 30,000 हून अधिक ईव्हीने गेल्या 4 वर्षांत देशभरात 1 दशलक्ष किमीपेक्षा जास्त अंतर कापले आहे. त्यानंतर ही पहिलीच घटना समोर आली आहे.