मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: मंगळवार, 21 जून 2022 (16:41 IST)

मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात तमाशा, पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले

एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण मुंबईचे असल्याचे सांगितले जात आहे. जिथे एका  महिलेने मंदधुंद अवस्थेत गोंधळ घातला आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. व्हायरल व्हिडीओमध्ये ती महिला पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरूनलाथ मारण्याचा प्रयत्न करताना, रस्त्यावर पडून आणि कॅब ड्रायव्हरला शिवीगाळ करताना दिसत आहे. ही घटना मार्च महिन्याची असल्याचा दावा केला जात आहे पण आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. @SunainaHoley नावाच्या वापरकर्त्याने ते ट्विटरवर शेअर केले आणि म्हटले की, 'या मद्यधुंद मुलीने नवी मुंबईतील वाशी येथे 'नवी मुंबई पोलिसां'शी गैरवर्तन केले. तो एक पुरुष पोलीस अधिकारी आहे आणि तो मुलीला हात लावू शकत नाही म्हणून ती मुलगी त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करते. तिथेच कायदा चुकतो. पोलीस कर्मचाऱ्याने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते कौतुकास्पद आहे. या वर काही कारवाई होईल अशी आशा आहे.
 
 
महिला युजरने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'त्याची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले आणि त्याच्या पालकांसाठी वाईट वाटले. इतके मद्यपान करू नका की आपण स्वत: ला सांभाळूशकत नाही. व्हिडिओमध्ये मुलगी गोंधळ घालताना दिसत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत आहेत.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी तरुणीवर टीका करण्यास सुरुवात केली. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली काहीही होत असल्याचे काहींनी सांगितले