शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (14:59 IST)

करुणा शर्मा यांच्यासह स्वीयसहायक यांना अटक

arrest
विवाहित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ तसेच पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकल्या प्रकरणी करुणा शर्मा यांच्यासह स्वीयसहायक यांना येरवडा पोलिसांकडून मुंबईतून अटक करण्यात आली. करुणा शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी आरोप केले होते.
 
याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करुणा शर्मा (वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत.
 
तरुणीच्या पतीला घटस्फोट पाहिजे होता. करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. शर्माने हॉकीस्टीकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले होते.
 
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. येरवडा पोलिसांच्या पथकाने शर्मा आणि त्यांच्या स्वीयसहायकाला सोमवारी रात्री मुंबईत ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.