रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (14:56 IST)

मुंबईत इमारतीच्या आगीत 14 जण अडकले, सर्वांची सुखरूप सुटका

मुंबईच्या बोरिवलीत शनिवारी रात्री एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत 14 जण अडकले होते. त्यांना सुखरूप काढण्यात आले. 

बोरिवलीत धीरज सवेरा इमारतीत शनिवारी रात्री 14 व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली . लागलेल्या आगीत या मजल्यावरील 14 जण अडकले होते.या आगीत चौदाव्या मजल्यावरील दोन फ्लॅट्स आगीत जळाले. त्यातील मौल्यवान सामान देखील जळून खाक झाले आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट आहे. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.