गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (10:21 IST)

रवी राणां विरोधात वॉरंट

ravi rana
अमरावती न्यायालयाने अमरावतीचे आमदार रवी राणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
अमरावती पोलीस हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी आले होते. मात्र, रवी राणांच्या घरी कोणीही नसल्याने हे वॉरंट स्विकार करण्यात आलेलं नाही.
 
त्यामुळे रवी राणांना विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वॉरंट बजावण्यात आल्याने भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
 
फेब्रुवारी 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला होता.
 
अमरावती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मात्र घटनेच्या वेळी आपण दिल्लीतच असल्याचे राणांनी सांगितले.