शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (12:13 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियासाठी रुग्णालयात दाखल

raj thackeray
Raj Thackeray Surgery :मनसे अध्यक्ष राजठाकरे यांना हिपबोनचा त्रास होत आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया उद्या म्हणजे 19 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यांना आज शस्त्रक्रियेच्या पूर्वी वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीचा त्रास वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला

त्यांना शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. यापूर्वी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. मात्र त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यावर त्यांना कोरोना झाल्याचे आढळले. त्यामुळे त्यांची ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून आता ही शस्त्रक्रिया उद्या रविवारी 19 जून रोजी होणार आहे. राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यात आला.