बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (18:57 IST)

4 हात-4 पायांच्या चहुमुखीवर यशस्वी शस्त्रक्रिया

अभिनेता सोनू सूदच्या मदतीने चहुमुखी कुमारी या चिमुकली वर सुरत येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या जन्मापासूनच तिला 4 पाय आणि 4 हात होते. ती मूळची बिहारच्या नवादा जिल्ह्यातील आहे. 
 
लोक त्याला गरिबांचा मसिहा का मानतात, हे अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चार हात आणि चार पायांच्या चिमुरडीवर उपचारासाठी बिहार सरकारकडून कोणतीही मदत होत नसताना सोनू सूदने त्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करवून घेतली आहे. ऑपरेशननंतर मुलीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. 
 
ही छायाचित्रे पाहिल्यानंतर विश्वास ठेवणे कठीण जाईल की ही तीच मुलगी आहे जी काही दिवसांपूर्वी तिच्या आई-वडिलांसोबत रस्त्यावर दिसली होती. पोटातून दोन हात पाय बाहेर पडत होते. अडीच वर्षांची ही चहुमुखी कुमारी ही नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज ब्लॉकमधील सौर पंचायतीच्या हेमडा गावची रहिवासी आहे. 

चहुमुखी कुमारी हिच्यावर सुरत येथील किरण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेल्या वचनानुसार सोनू सूदने चहुमुखी कुमारी वर ऑपरेशन करून तिला नवजीवन दिले आहे जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा सोनू सूदने ती पाहिली आणि आपल्या वतीने मुलीवर शस्त्रक्रिया करण्याची घोषणा केली. आता चहुमुखी कुमारीला सामान्य मुलांप्रमाणे वाचन आणि लेखन करता  येणार आहे. 
 
सौर पंचायतीच्या प्रमुख गुडिया देवी यांचे पती दिलीप राऊत 30 मे रोजी चहुमुखी आणि तिच्या कुटुंबासह मुंबईला निघाले होते. मुंबईला पोहोचल्यावर सोनू सूदने चहुमुखीची भेट घेतली आणि तिला उपचारासाठी सुरतला पाठवले. 
 
सुरतमधील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्वांगीण वैद्यकीय तपासणी केली. यानंतर किरण हॉस्पिटलचे डॉक्टर मिथुन आणि त्यांच्या टीमने तब्बल 7 तासांत  चहुमुखीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. मुखियाचे पती दिलीप राऊत यांनीही सोनू सूदचे या उदात्त कार्याबद्दल मनापासून आभार मानले. सध्या या निरागस चिमुकली ला आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार यानंतर ती एका सामान्य मुलाप्रमाणे हॉस्पिटलमधून बाहेर पडेल आणि सामान्य मुलाप्रमाणे जगू शकेल .सोनू सूदने स्वतः शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलला आहे.