1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रसिद्ध संगीतकार निर्मल यांचे निधन

Nirmal Mukherjee Death
प्रसिद्ध संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी आहे. मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निर्मल मुखर्जी हे 72 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार निर्मल मुखर्जी यांनी वयाच्या 10 वषापासून संगीतकार राजेश रोशनचा सहाय्यक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ते पश्चिमेतील सर्व वाद्ये वाजवण्यात तरबेज होते तर त्यांनी संगीतकारांसोबत काँगो, बोंगो, दरबुका, तुंबा तसेच डी-जेम्बे ही वाद्ये वाजवली.