शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (13:13 IST)

अभिनेत्री जया बच्चन इंदूर विमानतळावर भडकल्या

जया बच्चन या त्यांच्या कठोर स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्याच्या परवानगी शिवाय फोटो काढणे त्याला तीव्रपणे नापसंत असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने असा उद्धटपणा केला आणि त्यानंतर जया बच्चन संतापल्या.  
 
अभिनेत्री पती अभिनेते अमिताभ बच्चनसोबत इंदूरला पोहोचली होती. जिथे विमानतळावर कुणीतरी त्यांचा फोटो क्लिक केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
 
जिथे जया बच्चन एका व्यक्तीला फोटो काढण्यास मनाई करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जया यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले आहे. तेव्हाच अभिनेत्रीला एक अज्ञात व्यक्ती व्हिडिओ बनवताना दिसते. जया म्हणाली- कृपया माझे फोटो काढू नका. माझे फोटो नका घेऊ.  जया दोनदा म्हणते पण ती व्यक्ती ऐकत नाही. तेव्हा जया म्हणते- तुला इंग्रजी कळत नाही का? 
 
दुसरी व्यक्ती व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला बाजूला करायला लावते. आणि म्हणतो, नाही म्हटलं होत नं? तेवढ्यात जया बच्चनचा आवाज येतो. ती म्हणते- अशा  लोकांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

 
जयाचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. जया बच्चन यांचा अशाप्रकारे एका चाहत्यावरचा राग यूजर्सना पसंत नाही 
 
इंदूरला पोहोचल्यानंतर जया बच्चन विमानतळ कर्मचाऱ्यांवर चिडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ आणि फोटो काढला. यावर जया बच्चन यांनी आधी त्याला नकार दिला, पण लोकं मान्य न केल्यावर जया बच्चन रागावल्या आणि विमानतळावरून निघून गेल्या आणि अशा कर्मचाऱ्यांना नोकरीतूनच काढून टाकलं पाहिजे, असं जया बच्चन म्हणाल्या.
 
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बॉलीवूड सम्राट अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासह इंदूरला पोहोचले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते. 
 
Edited By- Priya Dixit