‘पद्मावती’ चे शूटिंग रद्द
राजस्थानातील जयपूरमध्ये ‘पद्मावती’चे शुटींग सुरु असतांना झालेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण झाली. सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. त्यानंतर ‘पद्मावती’चं शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ते संपूर्ण क्रू मेंबरसह मुंबईला परतणार आहेत.
या शिवाय राजस्थानमध्ये पुन्हा कधीही शूटिंग न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे बॉलीवूडकरांनी ट्विटरवर राग व्यक्त केला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल, रितेश देशमुख, हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे.