Marathi Biodata Maker
✕

Ranveer Singh Nude Photoshoot Case: रणवीर सिंहची पोलिसांकडून चौकशी

Updated: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (18:27 IST)
 सोशल मीडियावर चित्रे समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला, एनजीओ आणि वेदिका चौबे यांनी चेंबूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रणवीर सिंगचे नग्न छायाचित्र 'पेपर' मासिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर सोशल मीडियावर शेअर केले गेले. यावरून सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला होता.
 आता मुंबई पोलिसांच्या पथकाने सोमवारी सकाळी अभिनेता रणवीर सिंगची दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. मात्र, रणवीर सिंगचीच चौकशी करण्यात आली की त्याच्यासोबत त्याचे सहकारी किंवा वकील उपस्थित होते की नाही हे कळू शकलेले नाही. अभिनेत्याचे बयाण नोंदवण्यात आले असून अभिनेत्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांकडून नुकतेच समोर आले आहे. 
 37 वर्षीय रणवीर सिंगवर भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293, 509 आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जे अश्लीलतेशी संबंधित आहे. अनेक पुरस्कार जिंकणारा अभिनेता रणवीर सिंगने 2010 मध्ये 'बँड, बाजा, बारात' आणि नंतर 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा', 'गोलियों की रास लीला-राम-लीला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'गुंडे' आणि 'गली बॉय' सारख्या चित्रपटांनी प्रसिद्धी मिळवली.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

इंस्टाग्रामवर १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध इंफ्लुएंसरने केली आत्महत्या

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

सनी लिओनीने खरेदी केली पांढऱ्या रंगाची दमदार SUV; किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क!

आलिया भट्टची सह-अभिनेत्री दिव्या विनेकर यांचे निधन

खरे लक्ष्य टायगर नसून सलमान होते; शूटर्सने घराची रेकी केली होती

पुढील लेख