Raju Shrivastava : राजू श्रीवास्तव यांना भेटायला कोणाला परवानगी नाही
प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ढासळत आहे. डॉक्टरांनी हे 24 तास काळजी घेण्यास सांगितले आहे. व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर सांगत आहे. तरीही त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.त्यांच्या मेंदूची ऑक्सिजन पातळी आता 50 टक्के आहे. त्यांची प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे त्यांना कोणतेही इतर संसर्ग होऊ नये आणि त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर कोणताही परिणाम होऊ नये या साठी डॉक्टरांनी कोणालाही आयसीयू मध्ये जाण्याची मनाई केली आहे. राजूला बरं होण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांचा रक्तदाब आता नियंत्रित आहे.
डॉक्टरांना कोणताही धोका पत्करायचा नाही. राजूला कोणीही येऊन भेटलं तर संसर्ग होऊ शकतो. सध्या राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.त्यांची पत्नी डॉक्टर कोणाला भेटू देत नसल्यामुळे अस्वस्थ आहे. राजू श्रीवास्तव यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांना लवकर बरे वाटावे या साठी त्यांचे चाहते देशभरात प्रार्थना करत आहे.