suvichar
✕

सलमान दोषी, शिक्षा मात्र निर्मात्यांना, ५०० कोटीहून अधिक रुपये पणाला

Updated: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:59 IST)
 
‘बिग बॉस ११’च्या एका भागासाठी सलमानला ११ कोटी रुपये इतकं मानधन आकारलं जात होतं. त्याचप्रमाणे ‘दस का दम’च्या २६ भागांसाठी सलमानला एकूण ७८ कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार असल्याचं कळत आहेत. या रकमेची फोड केली असता लक्षात येतंय, की कार्यक्रमाच्या एका भागासाठी सलमानच्या वाट्याला तीन कोटी रुपये येणार आहेत. पण, न्यायालयाची सुनावणी आणि त्यापुढील परिस्थिती पाहता ‘दस का दम’च्या वाटेतील अडचणी आल्या आहेत. यंदाच्याच वर्षी जून महिन्यात ‘दस का दम’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
काही चित्रपट आहेत ते असे ..
 
रेस थ्री - हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं बजेट 100 कोटींपेक्षा जास्त आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असलं तरी तो हिट करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांना प्रमोशनसाठी सलमानची गरज भासेल.
 
भारत - हा सलमानचा बिग बजेट आणि महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. जवळपास दोनशे कोटी रुपये इतकं 'भारत'चं बजेट आहे. सिनेमाचं शूटिंग जून महिन्यात सुरु करण्याचं प्लॅनिंग आहे.
 
किकचा सिक्वल - साजिद नाडियादवाला यांनी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किक' सिनेमाच्या सिक्वलची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर अद्याप काम सुरु आहे.
 
दबंग 3 - दबंग चित्रपटातील चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांची मनं जिंकली. आता दबंगच्या तिसऱ्या भागाची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. 

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

रजनीकांतच्या 'जेलर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, ३ दिवसांत एवढी कमाई केली

कॉपी स्क्वॉड' फेम दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

यामी गौतमच्या 'नयी नवेली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली

पुढील लेख
Show comments