शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (17:00 IST)

‘सिक्रेट सुपरस्टार’ चा ट्रेलर रिलीज

आमीर खान आणि ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आमीर खानने ट्विटरवरुन हा ट्रेलर रिलीज केला आहे.

14 वर्षांच्या इन्सियाला पार्श्वगायिका होऊन जगभरात नाव कमवण्याची इच्छा आहे. इन्सियाच्या आईचा तिला छुपा पाठिंबा आहे, मात्र वडिलांचा ठाम विरोध आहे. 2 मिनिटं 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये तिचा हा प्रवास उलगडताना दिसतो.

वडिलांच्या विरोधानंतरही इन्सिया बुरखा घालून गाणं गाते आणि यूट्युबवर व्हिडिओ शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळते. यापुढे काय होतं, हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अद्वैत चंदन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आमीर खान, किरण राव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.