रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शुटिंग दरम्यान अपघात, शाहरुख थोडक्यात बचावला

अभिनेता  शाहरुख खान अपघातात थोडक्यात बचावला आहे. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमा शुटिंग सुरू असताना सेटवर अपघात झाला.  यात दोन क्रू मेंबर जखमी झाले आहेत. सेटवर ज्याठिकाणी शाहरुख बसला होता तेथे सीलिंगचा मोठा भाग कोसळला. यात शाहरुखला किरकोळ दुखापत झाली आहे. काळजी करण्याचे कारण नाही.

या अपघातात जखमी झालेल्या  दोन क्रू मेंबर्सना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.  अपघातामुळे सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये राय यांच्या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता.  आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमामध्ये शाहरुख व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.