गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2024 (15:53 IST)

प्रसिद्ध गायिका यांचे निधन!

प्रसिद्ध गायिका आणि टीव्ही होस्ट उमा रामनन यांचे निधन झाल्यामुळे दक्षिण चित्रपट सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसला आहे. उमा रामनन या दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये नावाजलेल्या एक गायिका होत्या. तसेच त्या तमिळ गायिका नावाने देखील ओळखल्या जायच्या. गायक सोबत त्या प्रसिद्ध होस्ट देखील होत्या. 
 
उमा रामनन यांचे याच्या 69 वर्षी चेन्नईमध्ये निधन झाले असून, उमा यांच्या कुटुंबावर तसेच दक्षिण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. पण चे निधनाचे नक्की कारण समोर आले नाही. उमा रामनन यांच्या कुटुंबात त्यांचे पती, मुलगा यांचा समावेश आहे. इलैयाराजाच्या सहकार्यांपैकी उमा रामनन या एक होत्या. निझलगल या चित्रपटातील गाण्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. 
 
उमा रामनन यांनी अनेक हिट चित्रपट दिले. तसेच त्यांचे हे चित्रपट खूप गाजलेत. उमा रामनन या तीन दशकांच्या यशस्वी गायिका होत्या. त्या खूप नावारूपास आल्या होत्या. त्यांचा गायन प्रवास श्रीकुष्ण लीला या चित्रपट 1977 साली एस व्ही व्यंकटरमन यांनी संगीत दिलेल्या 'मोहन कन्नन मुरली' या गाण्यापासून सुरु झाला. त्यांची भेट ए. व्ही. रामनन यांच्यासोबत शास्त्रीय शिक्षण घेतल्यानंतर झाली. उमा रामनन यांनी खूप सारी गाणी तामीळमध्ये गायिली. तसेच उमा रामनन या लाईव्ह स्टेज आर्टिस्ट देखील होत्या. त्याच्या या काळ झालेल्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना, कुटुंबाला आणि दक्षिण चित्रपट सृष्टीला धक्का बसला असून दुःखाचा डोगर कोसळला आहे. त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik