Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीर-ज़ारा 20व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित, पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग!

Updated: बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (16:27 IST)
 
यशराज फिल्म्सची आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर वीर-ज़ारा, ज्याचे दिग्दर्शन महान चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी केले आहे, 7 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर 600 स्क्रीन्सवर पुन्हा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वीर-ज़ारा पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्यासह वीर-ज़ारा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. आपल्या प्रदर्शित होण्याच्या वर्षी, भारत, परदेश आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.
 
री-रिलीजमध्ये अमेरिका, कॅनडा, यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवैत, यूके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका अशा मोठ्या बाजारातही ही फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.
 
विशेष म्हणजे, या री-रिलीज प्रिंट्समध्ये पहिल्यांदाच ‘ये हम आ गये है कहां’ हे गाणे देखील समाविष्ट केले जाईल. यापूर्वी हे गाणे चित्रपटातून वगळले गेले होते, पण आता हे गाणे चित्रपटाचा भाग असेल!
 
नेल्सन डिसूझा, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वितरण म्हणाले, “
वीर-ज़ारा ला जगभरात एक मोठा फॅन बेस आहे आणि या २०व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही हा चित्रपट पुन्हा रिलीज करत आहोत, जेणेकरून चाहते जगभरात ही प्रेमकहाणी पुन्हा अनुभवू शकतील. सोशल मीडियावर वाढता उत्साह, तसेच जगभरातील फॅन्सचे रिक्वेस्ट पाहून यशराज फिल्म्सने हा निर्णय घेतला आहे. हा पाऊल आमच्या फॅन्ससाठी एक खास भेट आहे.”

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

मराठी अभिनेत्री वनिता खरात एका मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याची बळी ठरली

हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडा...'; शर्मिला टागोर यांच्या 'वंदे मातरम' वक्तव्यावर कंगना रणौतचा घणाघात!

गोविंदाला 'चिची' हे नाव कसे मिळाले? याचे कारण खुद्द सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले, जुने वक्तव्य समोर आले

Gopinath Temple Uttarakhand महादेवाचे असे मंदिर! जिथे शिवाने गोपींचे रूप घेतले होते

पुढील लेख
Show comments