Daily Horoscope
✕

दक्षिणेतील दिग्गज अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन

Updated: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (13:11 IST)
 
हा अभिनेता गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंज देत होता. सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. वृत्तानुसार, अभिनेत्याचे अंतिम संस्कार उद्या, 24 डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे होणार आहेत.
 
वामशी आणि शेखर यांनी ट्विटर हँडलवरून अभिनेता कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते लिहितात, 'ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण गरू यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कैकला सत्यनारायण यांनी आज सकाळी हैदराबादमधील फिल्म नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 
अभिनेत्याने 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी लग्न केले आणि ते दोन मुली आणि दोन मुलांचे पालक आहेत. सत्यनारायण यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
 
कैकला सत्यनारायण हे तेलुगू सिनेमातील सर्वात प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश बाबू ते एनटीआर आणि यश यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. ते एक अभिनेते तसेच चित्रपट निर्माते होते. त्यांनी तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट KGF सादर केला.
 
गेल्या वर्षीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अभिनेत्याला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 87 वर्षीय कैकला दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. या अभिनेत्याच्या निधनावर दक्षिण भारतीय चित्रपटांतील बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

पुढील लेख
Show comments