Dharma Sangrah
✕

OMG 2 Trailer ओएमजी चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Updated: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (13:12 IST)
 
OMG 2 चित्रपटाची कथा कांती शरण मुद्गल म्हणजेच पंकज त्रिपाठी या सामान्य माणसाच्या जीवनाभोवती फिरते. कांतीची भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा आहे. मुलासाठी कांती देशाच्या शिक्षण व्यवस्थेला कोर्टात घेऊन जातो. आपल्या मुलासाठी कांती देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा सामना करताना दिसत आहे. या लढ्यात अक्षय कुमार शिवाचा दूत म्हणून त्याच्यासोबत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार कांतीला प्रत्येक वळणावर प्रोत्साहन देतो. कोर्टात कांतीचे यामी गौतमशी वाद दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात समाजाशी निगडित काही समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंकज त्रिपाठीची कांती ही व्यक्तिरेखा खूप प्रभावित करते, तर अक्षय कुमारची शिव दूतची भूमिका देखील प्रभावित करते. त्याचबरोबर वकील बनलेल्या यामी गौतमनेही छाप पाडली आहे. एकूणच या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे
हा चित्रपट 2012 च्या हिट चित्रपट 'ओएमजी - ओह माय गॉड' चा सिक्वेल आहे ज्यात अक्षय आणि परेश रावल यांनी अभिनय केला होता. तब्बल 11 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 सोबत टक्कर होणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त 'OMG 2' मध्ये यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments