suvichar
✕

Zwigato Trailer Out कपिल शर्माच्या चित्रपटाचा ट्रेलर

Updated: बुधवार, 1 मार्च 2023 (16:35 IST)
 
'झ्विगाटो'च्या ट्रेलरमध्ये ही गोष्ट चांगलीच दाखवण्यात आली आहे. कपिल शर्मा या चित्रपटात फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत आहे. ज्यात तो रेटिंगसाठी धावपळ करताना दिसतो. त्याची मुलगी हे देखील म्हणताना दिसते की 'पापा अगर आप ग्राहक के साथ सेल्फी लेंगे तो आपको दस रुपये एक्स्ट्रा मिलेंगे'. 
 
दोन मुलं, बायको आणि वृद्ध आई या जबाबदाऱ्यांचे ओझे घेत एका माणसाला शेवटी काय काय करणे भाग पडतं हे यात दाखवण्यात आले आहे.
 
फूड डिलिव्हरीच्या संख्येवर आधारित अॅपचे रेटिंग आणि ते रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या ऑर्डर वितरित करण्याची धडपड यांमध्ये एखादी व्यक्ती किती हताश होऊन अडकू शकते हे ट्रेलर दाखवतो. ग्राहकापर्यंत त्याची ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला हवामान, गर्दी आणि रस्त्यावरील जाम अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
नेहमी हसत राहणारा आणि हसवणारा कपिल शर्मा ट्रेलरमध्ये हताश दिसत आहे. त्यावर घरची जवाबदारी स्पष्ट दिसत आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून त्याची शैली प्रेक्षकांना किती आवडेल हे तर चित्रपट बघूनच कळेल. नंदिता दास दिग्दर्शित हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक करणाऱ्या मनसे नेत्याला अटक

मुंबई EOW ने अभिनेता दिनो मोरियाला अटक केली! मिठी नदी ड्रेनेज स्कॅम प्रकरणात मोठा धक्का

अभिनेत्री नुसरत भरुचाच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर; बालीहून मुंबईला एअरलिफ्ट करण्यात आले

प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात १० वर्षांनंतर मोठा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाने राहुल राज सिंगला दोषमुक्त केले

Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान

पुढील लेख
Show comments