'रंगतारी' ने यूट्युबवरील लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले
तरूणाईचा आवडता गायक हनी सिंग याच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या 'रंगतारी' या गाण्याने यूट्युबवरील लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉलीवूडच्या आगामी 'लवरात्री' या चित्रपटासाठी हनी सिंगने हे गाणे गायले आहे. हे गाणे यूट्युबवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. यापूर्वी यूट्युबवर हिट ठरलेल्या केन वेस्ट आणि 'मारून ५' बँडच्या गाण्यांना 'रंगतारी'ने मागे टाकल्याचे हनी सिंगने सांगितले.
गेल्या काही वर्षांत हनी सिंगने अनेक हीट गाणी दिली आहेत. ही गाणी तरुणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती. यापैकी 'चार बोतल बोदका, काम मेरा रोजका', 'धीरे धीरे ब्राउन रंग ने', 'अंग्रेजी बीट ते ब्लू आइज' और 'अ लव डोज' या गाण्यांना तर तरुणाईने डोक्यावर घेतले होते.
दरम्यान, 'लवरात्री' या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिराज मीनावाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.