Daily Horoscope
✕

विशाल 'कमीना' आहे- प्रियंका चोप्रा

Updated: गुरूवार, 20 ऑगस्ट 2009 (16:07 IST)
विशाल भारद्वाजच्या 'कमीने'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. यात मराठी मुलीच्या भूमिकेतील प्रियंका चोप्राचे चांगलेच कौतुक होते आहे. यासंदर्भातच तिच्याशी केलेली ही चर्चा.

विशालने 'कमीने' असं चित्रपटाचं नाव सांगितलं, त्यावेळी काय वाटलं?
- मला वाटलं की विशाल गंमत करतोय. पण नंतर लक्षात आलं की तो गंभीर आहे. अशा तर्‍हेची नावं तोच ठेवू शकतो. मला वाटतं की आमच्या सगळ्यांत तो सर्वांत मोठा 'कमीना' आहे. हे त्याच्या कामातही दिसतं.

या नावाला गुलजार यांनीही पसंती दिली होती.
- हो. विशाल गुलजार यांचा मोठा चाहता आहे. गुलजार यांची स्वीकृती मिळाल्यानंतर या शीर्षकाविषयी असलेल्या शंका-कुशंका मोडीत निघाल्या.

' कमीने' हा शब्द बहुवचनी आहे. याचा अर्थ फक्त शाहिदच नव्हे तर सगळ्यांच तो लागू आहे काय?
- खरं तर या चित्रपटातील प्रत्येक जण 'कमीना' आहे. फक्त एक सोडून.

तो कोण?
- ते चित्रपट पाहून तुम्हीच ठरवा.

चित्रपटाच्या नावाबद्दल अनेकांना आक्षेप आहे.
- कमीना ही काही फार मोठी शिवी नाही. आपण रोजच्या जीवनातही कित्येकदा 'कमीना' असे म्हणत असतोच. शिवाय धर्मेंद्रजींची तर आख्खी करीयर या शब्दावरच उभी आहे.

कमीनेच्या सादरीकरणाविषयी बरेच काही बोलले जातेय.
- मला वाटतं हा विचार आपण करू नये. प्रेक्षकांना काहीच कळत नाही हे आपण समजू नये. हॉलीवूडचे चित्रपटही हेच प्रेक्षक पहातात. त्यांना सगळ्याच गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागत नाही. कमीने बनविणार्‍या टिमलाही हीच अपेक्षा आहे. आपण लोकांना 'बिनडोक' समजता कामा नये. त्यांना खूप काही कळतं.

मराठमोळी प्रियंका इथे पहा.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

Show comments